मध्यरात्री दुर्घटना; सुदैवाने स्टॉल बचावले मात्र हॉटेलचे नुकसान
*⚡कणकवली ता.२१-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरडवे रोड येथे साबिया गॅरेज भीषण आग लागली असून या आगीची झळ बाजुला असलेल्या अन्य एका हॉटेल सदगुरु यालाही बसली. तर घटनास्थळी एका लाईन मधे सुमारे २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना मध्यरात्री १ वा. सुमारास घडली आहे.
दरम्यान सविस्तर माहीती अशी की, साबिया ऑटो गॅरेज मागील बाजूस अज्ञाताने कोणी शेकोटी सदृश्य पेटवली असावी. त्याचीच झळ लागून सदर आग साबिया गॅरेजला लागली असावी असा अंदाज उपस्थितांकडून वर्तवण्यात येत असून यावेळी त्या गॅरेजमधे ज्वलनशील ऑईलसह इतर सामानासह क्रैब मधील गाड्या आदी भीषण आगीत जळून खाक झाले. त्यानंतर लगतच असलेल्या हॉटेल सदगुरू’ला देखील या आगीची झळ बसली. मात्र, वेळीच उपस्थित नागरिकांनी त्यातील सामाण बाहेर काढले. तर बाजुलाच एका लाईन मधे अन्य २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटणा टळली, तर आगीची माहीती मिळाताच कणकवली अग्निशमक दलाचा बंब दाखल झाला व आग विझवण्यास सुरवात केली. यावेळी सुशिल तांबे, वैभव आरोलकर, श्री. फर्नांडीस, ओमकार वाळवे, न. पं. कर्माचरी श्री. जाधव, श्री. मोर्य, गणेश लाड उपस्थित होते. तर पोलीस नाईक पी एस पार्सेकर, मकरंद माने, होमगार्ड आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच सदर आगीत बॅटरी, गॅरेजचे साहित्य, दोन ऑइलचे बॅरल असे आदी साहित्य मिळून लाख रु. चे नुकसान झाल्याचे गॅरेज मालक अस्लम शेख व शारूख शेख (रा.बोर्डवे )यांनी सांगितले.
