डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आर.पी. डी. च्या योगेश जोशीची निवड

सावंतवाडी ता.२०-:विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती या हेतूने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांचेकडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली जाते. सन २०२१-२२ यावर्षीच्या स्पर्धेसाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या एकूण ०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यापैकी एकूण ०४ विद्यार्थी प्रमाणपत्रसाठी पात्र ठरले तसेच विशेष म्हणजे कु· योगेश विवेकानंद जोशी (इ.०६ वी ) हा विद्यार्थी ९० गुण प्राप्त करून प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला व त्याची निवड पुणे येथे होणा-या पुढील प्रात्याक्षिक परीक्षेसाठी झाली आहे. याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत ,सचिव श्री. व्ही. बी.नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक ,शाळा समिती अध्यक्ष डॉ.दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही.धोंड, उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

You cannot copy content of this page