जिल्हास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शानामध्ये रामगड हायस्कूलचे यश

*⚡मालवण ता.२०-:* शासकीय तंत्रनिकेतन, मालवण यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनामध्ये रामगड येथील प्रगत विद्यामंदिर या प्रशालेतील इयत्ता दहावीमधील प्राची उल्हास तारी व केतन उल्हास सावंत यांनी मांडणी केलेल्या उपकरणास व प्रभावी सादरीकरणास दुसरा क्रमांक मिळाला.

या प्रदर्शानात जिल्ह्यातून कुडाळ हायस्कूल, भरतगड हायस्कूल,रोझरी हायस्कूल, रामगड हायस्कूल, पोईप हायस्कूल, मसुरे हायस्कूल, बँ नाथ पै हायस्कूल, तळगांव हायस्कूल या आठ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामधून प्रगत विद्यामंदिर रामगडच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतीस दुसरा क्रमांक मिळाला. यशस्वी विदयार्थी मार्गदर्शक शिक्षकश्री.पवार, विज्ञान परिचर श्री.व्ही.व्ही लिंगायत यांचे रामगड केंद्रांचे केंद्रप्रमुख डी. व्ही. जंगले, प्रशालेचे मुख्याध्यापक ए. एम. वंळजू, ज्येष्ठ शिक्षक एस. एच. कांबळे, शिक्षक डी. डी.सावंत.,सौ पी.पी. राणे, सौ. डी. आर. अडसूळ, सौ. एम. व्ही. कुवळेकर, शिक्षेकेतर कर्मचारी बी.के.घाडीगांवकर,श्री. आर. एस.जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. तसेच संस्था अध्यक्ष वा.स.प्रभूदेसाई, उपाध्यक्ष सु.रा.तळवडेकर, सचिव वि.म.मटकर,खजिनदारसदानंद वाघ, संस्था संचलाक अभय प्रभूदेसाई, सुभाष धुरी, विजय कुवळेकर, रामचंद्र घाडीगांवकर, तातोबा घाडीगांवकर, नरेंद्र हाटले, नरहरी परूळेकर, ज्ञानदेव जाधव, घनश्याम चव्हाण, रामचंद्र कामतेकर, मोहन घाडीगांवकर, पालक यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page