Headlines

राष्ट्रीय खेळाडू रिद्धी हडकर हिचा उद्या मालवणात नागरी सत्कार

आस्था ग्रुप तर्फे आयोजन क्रीडाप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन

*⚡मालवण ता.२०-: राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी मालवणची सुकन्या कबड्डीपटू रिद्धी नितीन हडकर हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. याबद्दल आस्था ग्रुपच्या वतीने रिद्धी हडकर हिचा नागरी सत्कार शुक्रवारी दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भंडारी हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे यामध्ये शहरातील क्रीडा क्षेत्रातील संस्थांना आणि क्रीडाप्रेमींना सहभागी करून घेण्यात येणार आहे अशी माहिती आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page