वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुका गिरणी मालक संघटनेच्या वार्षिक सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी आकांक्षा परब, उपाध्यक्षपदी मयुर आरोलकर, खजिनदारपदी सिद्धेश परब तर सचिवपदी भिकाजी सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.
वेंगुर्ला तालुका गिरणी मालक संघटनेची वार्षिक सभा वेंगुर्ला नगरवाचनालयाच्या सभागृहात १७ जानेवारी रोजी संपन्न झाली. या सभेस सल्लागार कुमार कामत, किशोर परब, किशोर वालावलकर, शंकर परब, प्रविण परब, संदिप बेहरे, स्वप्निल परब, सिद्धी नाईक, सचिन सामंत, ज्ञानेश्वर पडवळ, ज्ञानदेव पेडणेकर, शेखर गावडे व तालुक्यातील गिरण मालक उपस्थित होते.
