दत्ताराम सावंत यांना ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार

विविध क्षेत्रातील योगदानाचा सावंतवाडी रोटरीतर्फे गौरव

*⚡सावंतवाडी ता.१६-:* माडखोल-धुरीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सातू सावंत यांना रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. दत्ताराम सावंत यांनी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा व विधायक ठसा उमटविला आहे.

त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी विकासासाठी व सामाजिक परिवर्तनासाठी उत्तमरीतीने उपयुक्त ठरत असल्यामुळे त्यांना रोटरीचे पीडीजी डॉ. विनय कुमार रायकर पै यांच्या हस्ते ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरीचे गोवा प्रतिनिधी अजय मेनन, सावंतवाडी रोटरी क्लबचे गोल्डन जुबिली अध्यक्ष साईप्रसाद हवालदार सचिव सुधीर नाईक, खजिनदार आनंद रासम, ‘इव्हेंट’चेअरमन प्रमोद भागवत, दिलीप म्हापसेकर, प्रदीप शेवडे आदी मान्यवर उपस्थित होत. दत्ताराम सावंत यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून गेली १५ वर्ष ते सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड निर्माण होण्यासाठी अनेक विज्ञानप्रदर्शनातून विविध उपक्रम राबवित आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page