खारेपाटण सम्यकनगर – बंदरवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील सम्यकनगर बंदरवाडी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.

या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,ग्रा प सदस्य योगेश पाटणकर,शमशुद्दीन काझी,श्रीम.रीना ब्रम्हदंडे, कामाचे ठेकेदार श्री .सावंत तसेच सम्यक नगर,खारेपाटण येथील रहिवासी चारुदत्त साटविलकर, चंद्रकांत पवार,रामदास जाधव,भास्कर तोरसकर आदी मान्यवर उवस्थित होते. सम्यक नगर बंदरवाडी खारेपाटण येथील बौद्ध वस्तीच्या नागरिकांच्या मागणी वरून खारेपाटण ग्रामपंचायतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग याना प्रस्ताव पाठवून सदर रस्ता मंजूर करून घेतला असून समाज कल्याण विभागाच्यावतीने मागासवर्गीय वस्ती करिता राखीव असलेल्या निधीतून हा रस्ता बनवीण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी दिली.

सुमारे चार लाख रुपये खर्चून बनविण्यात येणाऱ्या या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण यांच्यावतीने सांगण्यात आले.

You cannot copy content of this page