*⚡सावंतवाडी ता.१६-: मळगाव-लक्ष्मीनारायणनगर येथील श्री गणेश मंदिरात ४ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मंदिरात नित्य पूजाअर्चा, विविध धार्मिक विधी व त्यानंतर आरती होणार आहे.
दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी महाप्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच ‘मास्क’सह कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री गणेश जयंती नियोजन मंडळाने केले आहे.
