निमित्ताने ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील अचिर्णे गावातील श्री रासाई देवीची यात्रा सोमवार दि. १७ जानेवारी, २०२२ रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने सकाळी ९.३० ते १.३० वाजता अचिर्णे ग्रामपंचायत येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. रासाई देवी जनकल्याण बहुउद्देशीय संस्था आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान तसेच श्री. राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी रक्तदान करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांनी सुशिलकुमार रावराणे ७७९८९५९०४९, स्वप्नील दर्डे ८३०८५८४३२३, बंटी रावराणे ९५४५८०२५६७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
