६ व्या वेतन आयोगाचे थकीत ५ हप्ते रोखीने द्या

अंशदान पेन्शन जमा रक्कम पीएफ खात्यात जमा करा;प्राथमिक शिक्षक संघटनेची उपमुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे मागणी

*⚡ओरोस ता.१५-:* 2005 पूर्वी सेवेत दाखल झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अंशदान पेन्शन योजनेतील दरमहा कपात केलेल्या लाखो रूपयाच्या रक्कमा जि प वित्त विभागाकडे अनामत संकीर्ण म्हणून जमा असून सदर रक्कमा संबंधीत शिक्षकांच्या पी एफ खाती व 6व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे 5 हप्ते रोखीने देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या शिष्टमंडळाने उपमुख्यलेखा व वित्त अधिकारी मदन भिसे यांची भेट घेऊन केली

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, कणकवली शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस, मालवण कार्याध्यक्ष रूपेश गरूड आदी उपस्थित होते.

1नोव्हेंबर 2005 पूर्वी सिंधुदुर्ग जि प मध्ये सेवेत दाखल झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शासनाने अंशदान पेन्शन योजना लागू केली.या शिक्षकांच्या नेमणुक पत्रात जुनी पेन्शनचे लाभ देण्यात येतील असा उल्लेख होता. प्रत्यक्षात अंशदान पेन्शन योजना 31 आॅक्टोबर 2005 रोजी शासनाने सुरू केली .त्यामुळे संबधीत शिक्षकांच्यावतीने प्राथमिक शिक्षक समिती राज्य शाखेने मान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सदर याचिकेचा निर्णय शिक्षकांच्या बाजूने लागला व जुनी पेन्शन योजना लागू झाली. या सर्व शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी खाते उडण्यात आली व दरमहाच्या भनिनि वर्गणी कपात सुरू करण्यात आली. नोव्हेंबर 2009ते आगस्ट 2010 या कालावधीतील अंशदान पेन्शनच्या दरमहा कपात केलेल्या रक्कमा व 6 व्या वेतन आयोगातील थकबाकीचे 5 हप्ते अशा लाखो रूपये रक्कमा वित्त विभागातच जमा आहेत. सदर रकमा संबधित शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा करणे आवश्यक असतानाही गेली 12 वर्षे हा प्रश्न तसाच असल्याने याबाबत शिक्षक समितीने वारंवार पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळेच तत्कालीन मुख्यकार्यकारीअधिकारी हेमंत वसेकर यांनी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आगणे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत केली. त्या समितीने दिलेल्या अहवालानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला. याबाबत शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या शिष्टमंडळाने उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन भिसे यांची भेट घेत याबाबत कोणती कार्यवाही केली विचारणा केली. यावर सदर प्रस्तावात काही त्रुटी असून त्याची पूर्तता तातडीने करण्याबाबत शिक्षण विभागाला कळविण्यात येईल असे भिसे यांनी सांगितले . 19 जुलै 2011 च्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या आदेशानुर अंशदान पेन्शनच्या एकूण मासिक कपातीच्या रक्कमा शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा करण्याचे आदेशित केले आहे. 8आॅक्टोबर 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार 1नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत लागलेल्या शिक्षकांच्या 6 व्या वेतन आयोगाची थकबाकी व्याजासह शिक्षकांना रोखीने अदा करणेबाबत आदेशित केलेले आहे त्यामुळे तात्काळ कार्यवाही करावी त्रुटी दूर करण्यासाठी शिक्षक समितीचे पूर्ण सहकार्य मिळेल अशीही चर्चा जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी केली. हा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शिक्षक समिती सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page