आंबेडकर नगर येथील ओहोळतील केली स्वच्छता

युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी;कचरा न टाकण्याचा लावला फलक

कुडाळ प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील वहाळामध्ये कुडाळ नगरपंचायत कर्मचारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील युवकांनी स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये वहाळाच्या पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची स्वच्छता करून यामध्ये कचरा टाकू नये असा सूचनाफलक लावण्यात आला. कुडाळ रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातून जाणाऱ्या वहाळाच्या पुलाजवळ काही नागरिक दररोज कचरा टाकतात त्यामुळे काळातील पाणी दूषित होते.

तसेच कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण होते या वहाळातील स्वच्छता करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीचे कर्मचारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील युवकांनी मोहीम राबवली या मोहिमेमध्ये वहाळातील कचरा बाहेर काढून वहाळ स्वच्छ केला या मोहिमेमध्ये कुडाळ नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर, मुकादम विलास मुणगेकर, दिलीप कदम, वामन राणे, संजय हेरेकर, रोहित परब, यशवंत कुडाळकर, अनिश सावंत, गोट्या कोरगावकर, राकेश केसरकर, सुभाष जाधव, रमेश देऊलकर, सतीश जाधव, कृष्ण नाईक, सुनिता कुडाळकर, गिरीश केसरकर, योगेश आंगणे त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील विलास कुडाळकर, संतोष कुडाळकर, भूषण (बंटी) कुडाळकर, सुरज कुडाळकर, निखिल मालवणकर, प्रथमेश कुडाळकर, ओंकार कदम, हंसराज जाधव, ऋतुराज जाधव, राहुल जाधव आदी उपस्थित होते. फोटो:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील वहाळामध्ये नगरपंचायत कर्मचारी व डॉ. आंबेडकर नगर येथील युवकांनी स्वच्छता मोहीम राबवली

You cannot copy content of this page