*⚡कणकवली ता.१५-: शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती नुकतीच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून प्रशालेत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला प्रथम मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.युवराज महालिंगे,प्रा.हरीभाऊ भिसे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.सुरेश पाटील, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
