*⚡वेंगुर्ला ता.१५-:* जागृती कला, क्रिडा मंडळाची खेळाडू व वेंगुर्ला शाळा नं.३ची विद्यार्थीनी कु. दिया दिलीप मालवणकर हिने वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पहिली ते दुसरी गटात प्रथम क्रमांक तर ९ जानेवारी रोजी मालवण येथे झालेल्या राखीताई पाटकर जिल्हास्तरीय अॅथलॅटिक्स स्पर्धेत ५० मी. धावणे प्रकारात ९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिया मालवणकरचे मॅरेथॉनमध्ये यश
