विठ्ठल कोरगांवकर तालुक्यात दुसरा

वेंगुर्ला प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ला शाळा नं.१मधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी विठ्ठल प्रसाद कोरगांवकर याने शहरी सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्ती प्राप्त करताना तालुक्यात दुसरा क्रमांक तर सिधुदुर्ग जिल्हा शहर सर्वसाधारण विभागातून २३ वा क्रमांक पटकाविला. या यशामुळे विठ्ठल याचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, सर्व समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page