*⚡कणकवली ता.१५-: कणकवली तालुक्यातील घोणसरी खवळेभाटले येथील जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ मंजूर झालेल्या घोणसरी मुख्य रस्ता ते खवळेभाटले लोरे कुंडलवाडी रस्ता ग्रामीण मार्ग ११८ आणि खवळेभाटले स्मशान भूमी रस्ता ते आग्रे तर्फे घरापर्यंत जाणारा रस्ता ग्रामीण मार्ग ११४ खडीकरण डांबरीकरण करणे या दोन नव्या रस्त्यांचा कामाचा शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. मृणाल पारकर,उपसरपंच विलास मराठे,भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर,कृष्णा कारेकर, विजय एकावडे, नितीन पारकर, उमेश राऊत,गणेश एकावडे, बाळकृष्ण सावंत, विजय रासम, परशुराम तर्फे,सुरेश एकावडे,अरुण आग्रे, वसंत तर्फे,प्रकाश घाग,संजय शिंदे,ठेकेदार हेरंब चिके,मिहिर मराठे आदी भाजापा कार्यकर्ते तसेच वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
