बाबा भालचंद्र महाराज यांची भक्तीगीते रसिकांना भुरळ घालणार
*⚡कणकवली ता.१५-:* बाबा भालचंद्र महाराज यांची भक्तीगीते समाज सेवक/उद्योगपती कै नामदेवराव मराठे निर्मित “गुरूमहीमा “लवकरच युट्युबवर येणार आहे. निर्माता/दिग्दर्शक ,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि आहुजा कंपनीचे सर्वेसर्वा तसेच “सोनी रेकॉर्डिंग, कोल्हापूर यांच्या आणि किसनराव फडतरे ,कोल्हापूर यांच्या परिश्रमाने भक्तीगीते मोबाईलवर ऐकता येणार आहे.
गायक ऊत्तरा केळकर, स्वप्निल बांदोडकर, मंदार आपटे, राजेश उमाळे, शशी मुंब्रे संगीत डॉ भोजराज चौधरी, डॉ राजेश उमाळे गीतकार ,डॉक्टर श्रीकांत नरुले, बबन सराडकर संगीत संयोजन बंटी देवेंद्र आणि संहिता लेखन डॉ. विठ्ठल दत्तात्रेय गाड, कणकवली यांची आहे.
तरी सर्वानी या भक्ती गीतांचा आस्वाद घ्यावा.हे भक्तीगीतांचे पुष्प उद्योगपती कै. नामदेवराव मराठे यांना अभिवादन करुन सादर करण्यात आले आहे. यापुर्वी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी बाबा भालचंद्र महाराज यांच्या भक्तीगीतांच्या ३ आणि व्हिडीओ सीडी २ केल्या. ज्या आज हि युट्युब च्या माध्यमातून आपण ऐकु शकता, पाहु शकता हे सर्व बाबांच्या आणि श्री स्वयंभू रवळनाथ पंचायत यांच्या कृपाशीर्वादाने घडते असे निर्माते, दिग्दर्शक म्हणाले
२००६ मध्ये ” भालचंद्र बाबा कैवारी “चा शुभारंभ युवा नेते संदेश पारकर यांच्याहस्ते झाला आणि २००७ मध्ये जिल्हा पर्यटनचा शुभारंभ नाम.नारायणराव राणे यांच्या हस्ते झाला, यावेळी संजय मालंडकर उपस्थित होते
