देवगड आगाराची लालपरी ६६ दिवसांनी सावंतवाडी मार्गावर मार्गस्थ

*⚡देवगड ता.१५-: रापम कामगारांचा संप दुखवटा अद्यापही सुरू असून देवगड आगारात सेवेत रुजू झालेल्या चालक वाहक यांच्या सहकार्याने देवगड आगाराची पहिली प्रवासी फेरी लालपरी ६६ दिवसानंतर देवगड सावंतवाडी स.८.००वा. पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झाली. देवगड आगाराची गाडी क्र.८९६ ही प्रवासी फेरी देवगड सावंतवाडी व्हाया कणकवली कुडाळ सावंतवाडी या फेरीवर चालक नामदेव कांबळे वाहक किरण खाडये यांनी सेवा बजावली..

यावेळी देवगड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या समवेत पोलीस कर्मचारी फकरुद्दीन आगा,संतोष नाटेकर यांनी प्रवासी फेरीला संरक्षण दिले. स.८वा देवगड आगारातून रवाना झालेली सावंतवाडी प्रवासी फेरी दु.१.३० वा. सावंतवाडी येथून परतीच्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे.अन्य मार्गावर प्रवासी फेरी सुरू करण्यासाठी आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर हे विभागीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील आहेत.या प्रवासी फेरीचे प्रवासी वर्गातून स्वागत करण्यात आले. फोटो देवगड आगाराची देवगड सावंतवाडी पहिली फेरी चालक वाहक,पोलीस बंदोबस्त

You cannot copy content of this page