*⚡कुडाळ ता.१३-: स्नेहांश इंटरटेनमेंट प्रस्तुत आणि शेखर गवस दिग्दर्शित ‘माली’ या शॉर्टफिल्म मधील कलाकार आणि कुडाळ येथील पिंगळी चा रहिवासी कुमार साईल महेंद्र सातार्डेकर यांचा मुंबई इंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट सहाय्यक बाल कलाकार म्हणून गौरविण्यात आले होते.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल युवा दिनाचे औचित्य साधत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने कुडाळ येथे डॉ. सुरज शुक्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सातोस्कर सर, बांबार्डेकर सर, मर्गज सर, भंडारी मॅडम आदी उपस्थित होते.
