*⚡सावंतवाडी ता.१३-:* जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आज सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा सरचिटणीस भरत उर्फ बंटी पुरोहित, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर आदी उपस्थित होते.
