उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर,
*⚡ओरोस ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झालीय. तर, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झालीय. दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकानं पराभव केला आहे. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विक्टर डांटस यांनी अर्ज केला होता आणि सुशांत नाईक यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज केला होता. भाजपची एकहाती सत्ता बँकेवर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हा बँकेत दाखल झालेले आहेत, त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणाऱ्या मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं आहे.
