स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* तुळस येथे चालू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्राचा प्रथम वर्धापनदिन श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य पटांगणावर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

श्री शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून व तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था तसेच रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या सहकार्यातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन कार्यक्रमाला सरपंच शंकर घारे, रयत शिक्षण संस्था साताराचे कौन्सिल सदस्य अॅन्थोनी डिसोजा, ग्रामपंचायत सदस्य शेखर तुळसकर, सोनू आरमारकर, श्रद्धा गोरे, शितल नाईक, जयवंत तुळसकर, अभ्यास केंद्राचे प्रशिक्षक व माजी सैनिक सुहास केरकर, महिला मंडळ अध्यक्ष सुजाता पडवळ, वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा.सचिन परूळेकर, जैतिराश्रित संस्थेचे स्थानिक प्रतिनिधी सगुण माळकर, माजी सैनिक प्रभाकर बेहेरे, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव राऊळ, संजय परब, प्रसाद घारे, शिवाजी स्कूल तुळस शिक्षक घोडे पाटील, स्कूल कमिटी सदस्य पराग सावंत, ग्रामसेवक आनंद परूळेकर तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे पालक वर्ग उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र प्रमुख प्रशिक्षक मार्गदर्शक व माजी सैनिक सुहास केरकर यांना अभ्यास केंद्राच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे व्यवस्थापक आकार फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रथमेश सावंत, उपाध्यक्ष सागर सावंत, सचिव समीर वालावलकर, सदस्य प्रविण कांदळकर, भगवान चव्हाण, समर्थ तुळसकर, विनय बांदेकर, ओंकार घारे, प्रसाद बांदेकर, रुपेश तुळसकर, संपदा तुळसकर, तन्वी तुळसकर, प्रतिक तुळसकर, सचिन नाईक, मनिष तांबोसकर, ओंकार तांबोसकर, रोशन राऊळ यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page