शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावर मल्टिपर्पज हॉलचे होणार बांधकाम…

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावर सुमारे ३५० लोकांच्या सोयीचा मल्टीपर्पज वातानुकूलित हॉल बांधण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून हे काम करण्यात येत असून यासाठी ७४ लाख किमतीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज पार्किंग सह हॉल बहुउपयोगी आणि शहराचे सौदर्य वाढविणारा आहे. लग्न समारंभ, कॉन्फरन्स, प्रदर्शन यासाठी या हॉलचा वापर करता येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नताही भर पडणार आहे. या कामासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आणि आमदार वैभव नाईक यांचे मार्गदर्शन आणि निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. या कामासाठी ८ टक्के कमी दराची निविदा आली आहे. त्यामुळे पालिकेचा सुमार ५.५० लाख रूपयांचा फायदा झाला आहे. या शिल्लक रक्कमेतून याच ठिकाणी अन्य काही सुविधा निर्माण करता येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांनी दिली.

You cannot copy content of this page