केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती;जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष उत्तम वाडकर यांची माहिती
सावंतवाडी : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेल्या पत्रकार पुरस्कारांचे वितरण बुधवारी माडखोल येथील सावंत फार्म येथे सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहेत. यावेळी पत्रकार जय भोसले, विश्वनाथ नाईक व दिव्या वायंगणकर याना गौरविण्यात येणार आहे.
यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, पद्मश्री परशुराम गंगावणे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देसाई उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष उत्तम वाडकर यांनी केले आहे.
