तालुका भातपिक स्पर्धेत भक्तप्रल्हाद चव्हाण यांचा प्रथम क्रमांक

वाघवणे येथील शेतकरी

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषि विभाग, येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात पीक स्पर्धेत वाघवणे येथील भक्तप्रल्हाद चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. भात पीक स्पर्धेसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात आले.

तालुक्यातील तेरा शेतकऱ्यांनी अर्ज भर होते. पिक कापणी वेळी गावपातळीवरील समीती समक्ष प्रत्येक शेतकऱ्यांजवळ एक आर क्षेत्रात कापणी करून घेण्यात आली. यावेळी वाघवणे भक्तप्रल्हाद चव्हाण ८२.६५ किलो प्रतिगुंठा उत्पन्न घेत प्रथम क्रमांक, निरोम येथील विश्वास आचरेकर यांनी ७७.२५ किलो प्रति गुंठा उत्पन्न घेत द्वितीय क्रमांक तर कांदळगाव येथील श्रीराम परब यांनी ६५ किलो प्रति गुंठा उत्पन्न घेत तृतीय क्रमांक मिळविला आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली.

You cannot copy content of this page