कुडाळात भाजप-मनसेचे नवीन समीकरण

*⚡कुडाळ ता.१२-:* कुडाळ येथे नगरपंचायतच्या उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर मनसेने जाहीर पाठींबा दिला असून, एका जागेवर भाजपने मनसेला जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतच्या स्थानिक पातळीवरील युतीची घोषणा आज भाजप कार्यालयात भाजप आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे,, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, भाजप नेते आनंद शिरवळकर, मनसे पिंगळी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page