पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय निर्बंधासह चालू करण्याची परवानगी द्या…

जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची आग्रही मागणी…

*⚡मालवण ता.११-:* गेली दोन वर्षे कोरोना व्हायरसमुळे बंद स्थितीत असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय हा नोव्हेंबर पासून थोड्या फार प्रमाणात पूर्वपदावर येत असताना ओमिक्रोन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले

असून स्थानिक प्रशासनाची ही भूमिका जे पूर्णपणे चुकीचे असल्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निर्बंधासह चालू करण्यात यावीत तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग ,वाटरस्पोट जलक्रीडा व्यवसाय ५० टक्के क्षमतेने कोविड निर्बंधाचे पालन करून सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे की, गेली दोन वर्षे कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला होता गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय सुरू होतो न होतो तोच ओमिक्रोन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत या आदेशामध्ये बदल न झाल्यास या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या टूर गाईड, वाहन चालक, हॉटेल, रेस्टॉरंट ,रिक्षाचालक, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा व्यावसायिक , सिंधुदुर्ग किल्ला होडी चालक, होमस्टे धारक याच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे तसेच गेल्या दोन वर्षातील बँक हप्ते व्याज लाईट बील पाणी बिल, शासकीय कर यामध्ये स्थानिक प्रशासन व राज्य सरकार कडून कुठलीही मदत स्थानिक पर्यटन व अन्य व्यावसायिकांना मिळालेली नाही आजही पर्यटन व्यावसायिक या कर्जाच्या बोजातून बाहेर येण्यासाठी व्यावसायिक पातळीवर प्रयत्न करीत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी जिह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय ,सिंधुदुर्ग किल्ला वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने कोव्हीड निर्बंधाचे पालन करून चालू ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास द्यावेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे

You cannot copy content of this page