कोलगावातील बेपत्ता व्यक्तीचा आडेलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

*⚡वेंगुर्ला ता.११-:* कोलगाव – चव्हाटावाडी येथील महादेव विजय नाईक (५०) यांचा मृतदेह आडेली – खुटवळवाडी येथील एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आहे. नाईक हे ४ जानेवारी पासून बेपत्ता होते. याची खबर सावंतवाडी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव नाईक हे ४ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. ते माघारी न परतल्याने तसेच नातेवाईक व इतरत्र कोठेही आढळून न आल्याने त्यांची सावंतवाडी पोलिसात बेपत्ताची खबर देण्यात आली होती. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत ते मनोरुग्ण असल्याचे म्हटले होते. दरम्यान त्यांचा मृतदेह आडेली येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला असून वेंगुर्ला पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, शिवसेना ओबीसी सेल तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गडेकर यांच्या सहित स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

You cannot copy content of this page