इनरव्हीलच्या माध्यमातून समाज कार्य करुया – स्मिता दामले

वेंगुर्ला प्रतिनिधी-ज्या समाजात आपण राहतो त्याचे आपण काही देणे लागतो. त्या समाजाप्रती काही काम करुन खारीचा वाटा आपण इनरव्हीलच्या माध्यमातून उचलूया असे आवाहन वेंगुर्ला क्लबच्या सेक्रेटरी स्मिता दामले यांनी केले.

१० जानेवारी रोजी वेंगुर्ला इनरव्हील क्लब तर्फे इनरव्हील दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या विभा सावंत, जान्हवी सावंत, वेंगुर्ला क्लब अध्यक्ष ज्योती देसाई, उपाध्यक्ष अफशान कौरी, आयएसओ वृंदा गवंडळकर, एडीटर डॉ.पूजा कर्पे, सदस्य आरती गिरप, अक्षया गिरप, अंकिता बांदेकर, श्रीया परब, सई चव्हाण, आकांक्षा परब, डॉ.दिपाली देसाई उपस्थित होते.

You cannot copy content of this page