पंतप्रधानांना दीर्घायुष्यासाठी महामृत्यूंजप मंत्राचे पठण

*⚡वेंगुर्ला ता.११-: पंजाब दौ-यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेत पंजाब काँग्रेस सरकारने हेतुपुरस्पर कुचराई केल्याने पंतप्रधान यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. शत्रूच्या षडयंत्रापासून त्यांचे रक्षण व्हावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी वेंगुर्ला भाजपाच्यावतीने १० जानेवारी रोजी ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरात महामृत्यूंजय जप करण्यात आला.

तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस वृंदा गवंडळकर यांनी गणेश पूजन केले. या जपाचे पठण अरुण गोगटे, श्रीकांत रानडे, किरण ताम्हणकर, अजित दामले, मयुरेश फाटक, कौशल नातू यांनी केले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, शितल आंगचेकर, स्मिता दामले, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, डॉ.पूजा कर्पे, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, बाळा सावंत, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, बाबली वायंगणकर, समिर कुडाळकर, बिट्टू गावडे, ज्ञानेश्वर केळजी, रसिका मठकर, वृंदा मोर्डेकर, आकांक्षा परब, विश्व हिदू परिषदेचे महामंत्री आपा धोंड, आशिष पाडगांवकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page