*⚡मालवण ता.११-:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होऊन संचालक म्हणून निवडून आलेले राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा साक्षी वंजारी, माजी आमदार सुभाष चव्हाण, दादासाहेब परब, जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, पक्ष निरीक्षक प्रशांत बावसकर तसेच जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
