ई-श्रम कार्डाचे ६५ लाभार्थ्यांना मोफत वाटप

*⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला भाजपाच्यावतीने ८ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व कार्ड कार्यक्रमात सुमारे ३५० असंघटीत कामगार व लाभार्थी उपस्थित होते. तर ६५ लाभार्थ्यांना ई-श्रम कार्डाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह सुषमा खानोलकर, शितल आंगचेकर, स्मिता दामले, बाबली वायंगणकर, प्रशांत खानोलकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, डॉ. पूजा कर्पे, पुनम जाधव, कृपा मोंडकर, श्रेया मयेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक नारायण सावंत यांच्या माध्यमातून मोफत ई-श्रम कार्ड कॅम्पचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page