सिंधुताईंना भाजपातर्फे श्रद्धांजली

वेंगुर्ला ता.११-: अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना भाजपा वेंगुर्ल्याच्या वतीने साईदरबार हॉल येथे श्रद्धांजली वहाण्यात आली. अॅड. सुषमा खानोलकर व डॉ.पुजा कर्पे यांनी सिंधुताई सपकाळ यांचा जिवनपट मांडताना अनाथ मुलांसाठी केलेले कार्य, शेकडो अनाथ बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि स्वतंत्र ओळख मिळवून देणारी त्यांची माई आणि समाजात‘ सिंधुताई‘ म्हणून ख्यातनाम झाली अशा शब्दांत श्रद्धांजली वाहीली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page