१६ वर्षांखालील ९६ क्रिकेटरचा सहभाग;सुनील नाईक प्रतिष्ठान व रोटरी क्लबचे १३ जानेवारी पासून आयोजन
*⚡सावंतवाडी ता.११-: सुनील नाईक प्रतिष्ठान व रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने व मान्यतेने सावंतवाडी जिमखाना मैदान येथे 13 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेच्या खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 वर्षाखालील 94 मुलांनी उपस्थिती लावून स्पर्धेसाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला.या व्यतिरिक्त आयकॉन खेळाडू ह्या चॉईस खेळाडूची निवड संघमालक करणार आहेत.या संघाच्या संघ निवडीसाठी खेळाडूंची गुणांकन पद्धतीने बोली बुधवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
या स्पर्धेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 वर्षाखालील मुलांना इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या धर्तीचा थरार अनुभवयास मिळणार आहे सुनील नाईक प्रतिष्ठान च्या स्तुत्य उपक्रमास सिंधुदुर्गातील खेळाडू पालक व प्रशिक्षक तसेच जिल्हा क्रिकेट असोसिएशनने मनस्वी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, रोटरीचे सचिव तसेच सुनिल नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर नाईक, महाराष्ट्राचा व कोलकत्ता नाईट रायडर्स चा खेळाडू निखिल नाईक, सिंधुदुर्ग संघाचा तसेच गोवा u23 चा खेळाडू अबू मंडगावकर अरुण घाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट प्रशिक्षक दिनेश कुबडे यांनी परिश्रम घेतले
