धक्का मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

*⚡मालवण ता.११-: धक्का मित्रमंडळ मालवण ग्रुपतर्फे गुरुवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ यावेळेत मामा वरेकर नाट्यगृह, मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ओरोस ब्लड बँकच्या मागणीची दखल घेऊन आयोजित करण्यात आले आहे. शासकीय नियमांचे पालन करून शिबीर संपन्न होणार आहे.

तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करून सहकार्य करावे. नाव नोंदणी साठी बाबु डायस – 9423302512, विजय पांचाळ -8082461263, हेमंत शिरगावकर- 9960116417 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page