सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा होतोय दुरुपयोग

भाजपा नेते प्रमोद जठार, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप

*⚡कणकवली ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक मतदान केंद्र कणकवली तहसीलदार कार्यालयात आहे.याठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांना सोडले जाते,उमेदवाराना मोबाईल दिले जात आहेत. सत्तेचा दुरुपयोग करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे पोलीस सत्ताधाऱ्यांना एक न्याय व आम्हाला दुसरा न्याय असे वर्तन करत असल्याचा आरोप भाजपा नेते प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप यांनी केला.

जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे चित्र कणकवली येथे दिसून आले. मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल वापरण्याच्या मुद्द्यावरून भाजपा नेते प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सत्ताधाऱ्यांवर पोलिसांवर आरोप केले. यावेळी मतदान केंद्र परिसरात असलेल्या दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्यात आला .

You cannot copy content of this page