जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्याच्या घरासमोर केली भानामती

कणकवलीतील प्रकाराची जोरदार चर्चा

कणकवली 30 डिसेंबर (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण शिगेला पोचलेले असताना आता या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कंगोरे देखील समोर येत आहेत. जिल्हा बॅंक निवडणुकी च्या मतदानाच्या आदल्या रात्री एका पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर असे देव देवस्कीचे प्रकार केल्याची ही बाब समोर आलीआहे रात्री उशिरा सदर पदाधिकारी घरी आल्यावर त्याला दिसल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांने केला. जिल्हा बँक निवडणूक ही भाजपा आणि महाविकासआघाडी करीता प्रतिष्ठेची असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे घडत असलेले प्रकार देखील चर्चेचा विषय बनले आहेत.

You cannot copy content of this page