सतीश सावंत यांना अटक करा

जि.प. अध्यक्ष संजना सावंत यांची पोलिसांकडे मागणी

*⚡कणकवली ता.३०-:* जिल्हा बँक निवडणूक प्रसंगी कणकवली येथील केंद्रावर आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सहकार समृद्धी पॅनलचे उमेदवार सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जि.प. अध्यक्ष संजना सावंत यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी कणकवली पोलिस स्टेशन येथे दाखल झाल्या.सतीश सावंत यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्हा बँक निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल आणू नये असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश असतानाही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल नेला याला जि.प.अध्यक्ष सौ . सजना सावंत यांनी आक्षेप घेतला.त्यावेळी दोघांमध्ये बाचबाची होऊन आक्षेपार्ह शब्दाचा उच्चार झाला. त्यानंतर सौ. संजना सावंत यांनी कणकवली पोलीस ठाणे गाठून आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली . मतदान केंद्रावर घडलेल्या प्रकाराची व्हिडीओ क्लीप आपल्याकडे असून मला अपमानस्पद वागणूक देत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सतीश सावंत यांना अटक करा अशी सावंत यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे .यावेळी माजी प.स.सभापती सुजाता हळदीवे-राणे,माजी नगराध्यक्ष मेघा गागण यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page