आमदार दीपक केसरकर यांचे मतदारांना आवाहन…
सावंतवाडी ता.२९-:जिल्हा बँकेवर जर चांगल्या आणि सक्षम लोकांना निवडून दिल्यास चांगल्या योजना राबवून लोकांपर्यंत नेता येतील. शेतकऱ्यांना फायदा होणाऱ्या अनेक गोष्टी सहकाराच्या माध्यमातून राबवता येतील. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सतिश सावंत यांच्या पाठीशी उभे राहून सहकार क्षेत्र टिकवा. रिक्षा आणा आणि बँक वाचवा असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
