*⚡वेंगुर्ला ता.२८-:* महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळातर्फे डिसेंबर २०२१ गणित संबोध परीक्षा घेण्यात आली. यात उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून इयत्ता ८वीचे २२ तर इयत्ता ९वीचे २९ असे एकूण ५१ पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९४.११ टक्के लागला. तर विद्यालयाच्या प्रतिक्षा नाईक हिने १०० पैकी १०० गुण मिळविले.
इयत्ता नववीमधून प्रतिक्षा प्रदिप नाईक (प्रथम), संस्कृती चंद्रशेखर नाईक व साक्षी दयानंद वेंगुर्लेकर (द्वितीय), प्रथमेश अनिल भोकरे व पूर्वा गजानन कुबल (तृतीय) तर आठवीमधून दिपेश जयराम वराडकर (प्रथम), दिपक राजाराम साळगांवकर व खुशी बाबुराव नार्वेकर (द्वितीय), साईश अनिल भाईडकर (तृतीय) यांनी विद्यालयातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना पी.एस.अंधारी व यु.आर.वाळवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, चेअरमन विरेंद्र आडारकर, कार्यकारिणी सदस्य, पालक – शिक्षक संघ व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
