व्यसनांचीच राख रांगोळी करून नव्या वर्षाचा नवा संकल्प करा:अर्पिता मुंबरकर

कणकवली 28 डिसेंबर (प्रतिनिधी)- व्यसनामुळे व्यक्तीच्या आयुष्याचीच राखरांगोळी होते, असे नाही तर कुटुंबाचीच होरपळ होतांना आपण अनेक उदाहरणे पहात असतो. हे थांबवायचे असेल तर, व्यसनांचीच राख रांगोळी करून नव्या वर्षाचा नवा संकल्प करण्यासाठी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेऊयात. असे प्रतिपादन नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले.

नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग, डॉ.अनिल नेरूरकर प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत करा, चला व्यसनाला बदनाम करुयात. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तळेरे ग्रामपंचायतचे सरपंच साक्षी सुर्वे यांनी व्यसनमुक्ती वरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन केले. तसेच पं.स. सदस्य दिलिप तळेकर यांनी सर्वांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली.यावेळी व्ही .व्ही. दळवी यांनी विद्यार्थ्यांसमवेत गुटखा, तंबाखू, शिगारेट या सारख्या व्यसनांचीच राखरांगोळी केली पाहिजे म्हणून प्रतिकात्मक व्यसनांची पेटवून राखरांगोळी केली. तसेच या महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून व्यसनमुक्ती बाबत प्रबोधन केले. तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे च्या समन्वयक श्रावणी मदभावे, सतीश मदभावे यांनी तंबाखू च्या दुष्परिणामांची माहीती दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक गणेश कृष्णा तेली, आरोग्य सेविका सुचिता तळेकर यांनीही व्यसनांपासून होणाऱ्या आजाराबाबत माहिती दिली. तर व्यसनमुक्ती वरील पोस्टर प्रदर्शनाला ग्रा. पं. स. रुपाली रविंद्र भांबुरे कोमल किरण तळेकर, संगीता खानविलकर, युवराज बोराटे, सदाशिव राणे, हेमंत महाडिक, नितेश गुरव, नरेश शेट्ये, गौरी प्रमोद तळेकर, मानसी कुरतडकर, दिक्षा प्रभू पेंढारकर, सचिन दळवी, साक्षी भोकरे, अर्चना हिवाळकर, भवानी प्रसाद माळवदे, सिद्धी पावसकर, कृष्णकुमारी इस्वलकर, आदेश म्हसकर, दिलीप तळेकर, राजेश जाधव, गुरुप्रसाद सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page