४५ वर्षावरील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

*⚡वेंगुर्ला ता २८-:* वेंगुर्ला तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे रविवार दि. २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता नगरपरिषद कॅम्प मैदान येथे ४५ वर्षावरील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. यात प्रत्येक तालुक्यातील एक अशा जिल्ह्यातील आठ संघांना सहभाग दिला जाणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघास आकर्षक बक्षिस व चषक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाळू खांबकर (९४२२०५५०३९) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन यशवंत किनळेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page