तारकर्ली ग्रा. प.सदस्य डॉ. केरकर यांनी दिला गाव कृती समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा

१४ जून रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा दिला इशारा

*💫मालवण दि.११-:* तारकर्ली गावात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना या रुग्ण वाढीवर कोणतीही उपाय योजना न करता तालुका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तारकर्ली गावाला सावत्रपणाची वागणूक देत असल्याच्या निषेधार्थ तारकर्ली गावचे ग्रा. प.सदस्य डॉ जितेंद्र केरकर यांनी गाव कृती समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा तारकर्लीच्या सरपंचाकडे सुपूर्द केला आहे तर तारकर्ली गावातील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती १४ जून पर्यंत न मिळाल्यास प्रशासनाच्या गैर कारभाराविरोधात मालवण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा डॉ. केरकर यांनी दिला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ केरकर यांनी म्हटले आहे की, आपण पेशाने डॉक्टर असल्याने तारकर्ली गावात कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात आपण सेवा देत आलो व यापुढेही देणार आहोत. मात्र तालुका प्रशासन तारकर्लीतील कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्याऐवजी आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केरकर यांनी करून तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जाहीर करून त्यानंतर कोणत्या उपाययोजना केल्या ? पोलीस निरीक्षकांनी कृती समितीने मागणी केल्याप्रमाणे कोणत्या योजना केल्या ?, आरोग्य अधिकारी यांनी कोरोना चाचणी व लसीकरण याबाबत काय उपाययोजना केल्या ? तारकर्ली गावात कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी कोणते पूर्व प्लॅनिंग केले ? तारकर्ली गावासाठी किती डॉक्टर तपासणीसाठी दिले गेले ?, तारकर्ली ग्रामपंचायतीने वेळोवेळी सहकार्य करूनही तालुका प्रशासनाने ठोस उपाययोजना का राबविल्या नाहीत या सर्व प्रश्नांची उत्तरे १४ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत न मिळाल्यास तारकर्ली गावचा कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या या गैरकारभाराविरोधात १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्या पासून मालवण तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा डॉ. जितेंद्र केरकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page