अखेर “त्या” मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश

*💫सावंतवाडी दि.११-:* आज सायंकाळी जिमखाना मैदान येथे सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, मारुती नाईक ( वय ३८, मूळ रा. मनीकट्टी बेळगाव) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. सद्य स्थितीत तो कामानिमित्त सावंतवाडी शहरात राहत होता. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेले अनेक दिवस ही व्यक्ती शहरात मोल मजुरी करत होती. तसेच या व्यक्तीचे शहरात कोणीही नातेवाईक नव्हते. अनेकवेळा तो मोती तलावात देखील पडला होता. परंतु त्यातून तो सुखरूप वाचला होता. दरम्यान आज सायंकाळी तो जिमखाना येथे दळवी हॉटेल समोर पडलेल्या अवस्थेत एन डी आर एफ चा पथकाला दिसला असता. त्यांनी खात्री केली असता तो मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यानी पोलिसांना याची कल्पना दिली होती. त्यानुसार घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते.

You cannot copy content of this page