कोलगाव येथील प्रकार पोलिसांचा सुगावा लागताच संशयितांचा पोबारा
*💫सावंतवाडी दि.१०-:* कोलगाव येथे एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून सावंतवाडी पोलिसांना लागली होती. यावेळी त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस त्या ठिकाणी गेले असता, त्याचा सुगावा संबंधितांना लागल्याने त्यानी तेथून पळ काढला त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिली आहे.
