कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या तारकर्ली गावाला एन आर आय सुपुत्राचा वैदयकिय सुविधांचा आधार

अमेरिकास्थित स्वप्नील खराडे यांनी केली वैदयकीय साहित्याची मदत बंड्या पराडकर मित्रमंडळाने मानले आभार

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गावातील गंभीर स्थिती ओळखून तारकर्लीचे अमेरिकास्थित सुपुत्र स्वप्नील खराडे हे कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या आपल्या गावाच्या मदतीसाठी धावले आहेत. स्वप्नील खराडे यांनी स्व:खर्चातून गावासाठी ५००० मास्क, ५ ऑक्सिमिटर, १० डिजिटल थर्मामीटर, ५ थर्मल गन, आणि १० स्टिमर आपल्या भावा मार्फत गावासाठी दिले आहेत. स्वप्निल खराडे यांच्या या दातृत्वा बद्दल तारकर्ली येथील बंड्या पराडकर मित्रमंडळ व तारकर्ली ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले. कोरोना संकटात तारकर्ली गावातील लोकांची गरज ओळखून आणि गावाप्रति असलेल्या आपल्या प्रेमा-पोटी, कर्तव्य आणि गावचे ऋण फेडण्यासाठी म्हणून स्वप्नील खराडे यांनी आवश्यक साहित्य गावासाठी दिले आहे. गावाच्या बाहेर जाऊनही गाव संकटात असताना गावाची ओढ आणि गाववाल्यांची असलेली चिंता स्वप्निल यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे. त्यामुळे गावातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण देश- परदेशात नोकरी करतात, गावातील शाळांमधून शिकून मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करत आहेत, अशा इतर जिल्हावासिय परदेशात असलेल्या तरुणांनी श्री. स्वप्नील खराडे यांचा आदर्श घेत जिल्ह्यातील आपल्या गावाला जरी मदत केली तरी कोरोनाच्या काळात ती मोलाचीच ठरणार आहे. परदेशी असणाऱ्या इतरांनी देखील स्वप्नील यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपापल्या गावासाठी जमेल ती मदत करावी आणि कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी, आपल्या गावकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यास सहकार्य करावे, असे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे

You cannot copy content of this page