मालवण व्यापारी संघाने दिले तहसीलदारांना निवेदन
मालवण दि प्रतिनिधी लॉक डाऊनच्या काळात व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवून शासनाला आज पर्यंत सहकार्य केले आहे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लॉकडाऊनमूळे घरभाडे, लाईटबील, व्यवसायकर, कर्मचाऱ्यांचे पगार स्थानिक प्रशासन कर यामुळे व्यापारी डबघाईला आला असताना शासनाने कोणत्याही प्रकारची मदत व्यापारी वर्गाला अद्याप पर्यंत दिलेली नाही.त्यामुळे टाळेबंदी मुळे व्यवसाय बंद असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे सर्व कर्जाच्या हप्त्यांची वसुली थांबविण्याचे निर्देश बँकाना द्यावेत तसेच जिल्हा नियोजन मंडळ मधून प्रत्येक व्यापारी बांधवांचे चार महिन्याचे वीज बील देण्यात यावे या आणि इतर मागण्याचे निवेदन आज मालवण व्यापारी संघाने मालवणच्या तहसीलदाराना देत शासनाकडे आमच्या भावना कळवाव्यात अशी विनंती केली आहे मालवण व्यापारी संघाने आज मालवणचे तहसीलदार श्री अजय पाटणे यांची भेट घेत निवेदन सादर केले व चर्चा केली यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री उमेश नेरुरकर ,कार्यवाह रवींद्र तळाशीलकर, खजिनदार गणेश प्रभूलकर , सदस्य विजय केनवडेकर किरण कारेकर यशवंत मिठबावकर गुरुमाऊलीचे श्री . मुंबरकर आदी उपस्थित होते यावेळी श्री उमेश नेरुरकर यांनी मालवण शहरात जो कोरोना फोफावत आहे त्याला व्यापारी वर्ग जबाबदार नाही तर कोरोना रुग्ण आणि नातेवाईक खुलेआम फिरत आहेत त्यांना आळा घालण्यात यावा तसेच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त जी दुकाने आज बंद आहेत त्यांनाही शासनाने दुकाने उघडण्यासाठी मुभा द्यावी असे सांगितले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉक डाऊन काळात व्यापारी वर्गाला वीज माफीचे आश्वासन दिले गेले होते ते पोकळच होते शासनाने आज व्यापारी वगळता अन्य व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर केले व देण्यात आले; पण मध्यम वर्गीय किरकोळ व्यापाऱ्यांना कोणताही आर्थिक लाभ झाला नाही. लॉकडाऊन च्या परिस्थितीमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय बंद असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. काही छोट्या दुकानदारांकडे आज दोन वेळच्या पेजे साठीही पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच व्यापाऱ्यांना खासदार निधीतून ४ गॅस सिलिंडर मोफत देण्यात यावे तसेच आमदार फंडातून प्रत्येक व्यापाऱ्यास चार महिन्याचे मोबाईल रीचार्ज व रु. २५० चे टीव्ही रिचार्ज देण्यात यावे. व्यापारी हा समाजातील प्रमुख घटक असल्याने त्यांना विमा कवच देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत
