शिरोडा ग्राम पंचायतचा उपक्रम
*💫वेंगुर्ले दि.०६-:* शिरोडा ग्रामपंचायत मध्ये विविध कामाचा शुभारंभ करुन शिवराज्यभिषेक दिन साजरा करून स्वराज्य गुढी उभारण्यात आली.शासकीय आदेशानुसार आज येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजदंड स्वराज्य गुढी उभारून उत्सव साजरा करण्यात आला. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कोरोना विषयीचे शासकीय नियम पाळून शिवराज्यभिषेक दिन, व शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्याच प्रमाणे शासन आदेशानुसार शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित यांनी गुढीचे पूजन केले तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला असून मोठ्या उत्साहात व साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आजच्या शिवराज्याभिषेक दिना चे औचित्य साधून खर्डेवाडी जिल्हा परिषद शाळा येथे मुख्याध्यापक किरण मुळशी गुरुजी यांच्या उपस्थित शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे जलशक्ति अभियान अंतर्गत शोषखडडे मारणे उपक्रमाचा बागायतवाडी येथे शोष खड्डा बांधकामाचा शुभारंभ करुन स्वच्छतेविषयी संदेश देण्यात आला. तसेच प्रत्येक शाळेच्या आवारात गप्पी मासे पैदास टाक्या उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे ,रवी पेडणेकर ,प्राची नाईक, कौशिक परब, सौरभ गावडे, दीपक गावडे, ग्रामविस्तार अधिकारी सुनील चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो : शिरोडा ग्रामपंचायत समोर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुढी उभारण्यात आली
