*💫सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी येथील छावा युवा संघटना, सिंधुदुर्गच्यावतीने आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी अस्मिता भराडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी शिवप्रतीमेस पुष्पहार घालून महाराजांचे विचार मांडले. यावेळी जिल्हा अध्यक्ष शैलेश मयेकर, जिल्हा सचिव एकनाथ चव्हाण, सहसचिव मदन मुरकर, अस्मिता भराडी, सल्लागार अँड. सप्निल कोलगावकर उपस्थित होते. आभार प्रदर्शन मदन मुरकर यांनी केले.
सावंतवाडी येथील छावा युवा संघटनाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा…
