विद्यामंदीर हायस्कुलच्या 1985 च्या दहावी बॅचची सामाजिक बांधिलकी

कणकवली न.प. विलगीकरण कक्षाला दिले केअर किट

*💫कणकवली दि.०६-:* कणकवली नगरपंचायतीच्यावतीने भगवती मंगल कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या 100 बेडच्या विलगीकरण कक्षातील कोरोना रूग्णांसाठी विद्यामंदीर हायस्कुल कणकवलीच्या सन 1985 च्या दहावी बॅचच्यावतीने 150केअर किट नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे सुपूर्द केले. सामाजिक भावनेतून काम करत असताना कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी विद्यामंदिर हायस्कुलची 1985 च्या दहावीच्या बॅचने यापूर्वी ही न.प.च्या कोविड सेंटरला मदत केली होती.आज भगवती मंगल कार्यालय येथील विलगीकरण कक्षाला आम.नितेश राणे व जि.प.अध्यक्षा संजना सावंत,सभापती मनोज रावराणे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर.जे.पवार यांच्या उपस्थितीत केअर किट देण्यात आले. यावेळी 1985 च्या बॅचचे बंडू गांगण,आसिफ नाईक,नंदू पेडणेकर,संजित पारकर,भास्कर देसाई,किशोर सावंत,शिल्पा कामत,विना वळंजू,नंदिनी भाट,शुभांगी राणे,विद्या काणेकर,जयश्री परब,नीता सावंत सरिता पारकर आदींचा मदतीत सहभाग होता.

You cannot copy content of this page