खारेपाटण चेकपोस्ट येथे वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिन केला साजरा…

*💫कणकवली दि.०६-:* कोरोना काळात सिंधुदुर्गच्या सीमेवर ड्युटी बजावत असतानाच पर्यावरण दिनाचे महत्त्व जाणत खारेपाटण चेक पोस्ट येथे पथक प्रमुख शिक्षक , डाॕक्टर, पोलीस कर्मचारी यांच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक एस.एस.खंडागळे व पथक प्रमुख अविनाश मांजरेकर यांच्याहस्ते पारिजातक वृक्ष लावण्यात आला. यावेळी तळेरे हायस्कूलचे पी. एन. काणेकर , करूळ हायस्कूलचे आर जी. सावंत, के.ई. शंकरदास , व्हि .एन. मेस्स्री , डाॕ. सीमा आतिग्रे , पोलीस नाईक उद्धव साबळे ,पोलीस शिपाई पराग मोहिते , विक्रम काकडे, होमगार्ड सिद्धेश मेस्री ,खरात आदी उपस्थित होते. किमान एक झाड तरी आपण ऋतुमानानुसार लावले तरी आपण या भूतलावर जन्म घेऊन तो सार्थकी लावल्याचा आनंद आपल्याला मिळेल असे एस.एस.खंडागळे म्हणाले . तळेरे हायस्कूलचे शिक्षक तसेच पथकप्रमुख अविनाश मांजरेकर म्हणाले , जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी आम्ही विद्यालयात विद्यार्थ्यांसमवेत साजरा करतो.खारेपाटण येथे कोव्हिड ड्युटी बजावत असल्याने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून नेहमीच आपण निसर्गाचे देणे लागतो या निर्मळ भावनेतून मी व माझे सहकारी यांनी खारेपाटण चेकपोस्ट म्हणजेच ड्युटी बजावत असलेल्या ठिकाणी झाड लावण्याचे ठरवले.पर्यावरणाचे महत्त्व ओळखा , कोरोनाला हटवा असा संदेशही त्यांनी यानिमित्ताने दिला. पर्यावरण सुरक्षित तर आपण सुरक्षित हे लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी स्व कृतीतून बदल घडवणे अपेक्षित असल्याचे पी एन. काणेकर म्हणाले .आभार आर जी. सावंत यानी मानले.

You cannot copy content of this page